"फॅनधर्म"

                                    "फॅनधर्म"
भारतात अनेक धर्म आहेत, त्यापेक्षा जास्त जाती-पोटजाती, भाषा आणि देवदेवतांच तर विचारूच नका. खर तर एका अंगाने बघितलं तर आम्हाला 'विभागून' घेणेच आवडत म्हणा. मी अमका तू तमक्या चा......
            परंतु या सर्व धर्मानां पुरून उरणारा अजून एक धर्म आहे, "फॅनधर्म"...... !!!! होय, फॅनधर्म किंवा फॅनीजम. आपल्याला कल्पना असो व नसो आपण कमी अधिक प्रमाणात या धर्मात मोडतोच. धर्म आला म्हणजे देव आलाच! येथे मात्र देवाबद्दल गफलत नाही येथे फक्त एकच देव आहे..... होय एकचं देव ... आमचा तलैवा आपला रजनीकांत.... या धर्मांची व्याप्ती फारच मोठी आहे. भारतातील दक्षिणेत याचा प्रभाव जास्त असला तरी या धर्माचे अनुयायी जगभर पसरलेले आहेत. उगीच सांगत नाही तसा पुरावाच आहे माझ्याकडे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या नोंदीत आहे की  जगात सगळ्यात जास्त चाहतावर्ग (फॅन फोलोविंग) सुपरस्टार रजनीकांत यांचा आहे. तसा रेकॉर्डच केला आहे आम्ही!!!
गल्लीतल्या कट्ट्यावर चर्चा चालू असताना कोणी म्हणाला कि आपल्याला पण 'तेंडुलकर' आवडतो तर आपण दोघे चांगले मित्र होऊ, पण कोणी म्हणाला की "मी पण तलैवाचा फॅन आहे" तर ते दोघे जीवाभावाचे सख्खे भाऊ होऊन जातात. हीच तर ताकद आहे आमच्या देवाची. तुम्ही मी नाही तर बरेच मोठमोठी व्यक्तिमत्व सुध्दा आमच्या धर्मात मोडतात, जसे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. खरं आहे मित्रानो जेव्हा २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळत मोदी साहेब देशभर फिरत होते तेव्हा ते जेथे जेथे जात त्या गावातील मोठमोठी लोकं त्यांना भेटायला येत परंतु जेव्हा ते दक्षिणेत गेले तेव्हा ते स्वत:च पोहोचले आमच्या देवाच्या घरी तेही पांढरी 'लुंगी' घालून !! आठवलं का  ??...... कळालं  का आमच्या धर्माची ताकत ?
                       गेली चार दशकं तलैवा आमचं मनोरंजन करीत आहे पण आम्हा भक्त जणांना तो एकाच अवतारात आवडतो त्याने वयस्कर भुमिका करणे आम्हास मुळात खपतचं नाही तो नेहमी तरुणच राहणार आहे अशी आम्हाला आशा असते. आम्ही इतके देव वेडे आहोत कि विचारू नका, एका चित्रपटात आमचा देव शेवटी भुमिकेत मरतो; आम्हाला खपलचं नाही....जाळली सगळी चित्रपटगृहे ! नंतर तो शॉट कट करून पुन्हा प्रदर्शित झाला तो चित्रपट. देवाला फक्त आभासी दुनियेत पाहण्यासाठी आमची दोन-दोन दिवस रांग लागली चित्रपटगृहाबाहेर (शिवाजी द बॉस ) आणि आम्हाला अपेक्षा तरी काय ?? तर पूर्ण चित्रपटात देवाने त्याचा खास शैलीत एकदा काय पाय फिरवून बसला आणि हसला कि झालं... आम्ही तो चित्रपट पुन्हापुन्हा पाहू. मन तृप्त होई पर्यंत. इतकचं..! २२ जुलैला देवाचा कबाली चित्रपट येतोय संपूर्ण जगभर; विविध भाषेत. चेन्नईतील बऱ्याच व्यावसाईक कंपन्यांनी त्या दिवशी सुट्टी घोषित केली आहे. 'इतिहासात प्रथमच अस घडतंय कि चित्रपट पाहण्यासाठी खास विमान सेवा देण्यात येणार आहे'. एयर एशिया या विमान कंपनीने चित्रपट पाहण्या सठी आम्हा धर्म बांधवाना माफत दरात बेंगळूरू ते चेन्नई असा खास प्रवास सेवा देणार आहे. आम्ही आमच्या देवाची पुजा करतो, अभिषेक, हार, कट आउट, मंदिर, देवाच्या नावाने सामाजिक संस्था, सामाजिक कार्य काय काय म्हणुन विचारू नका सगळच. एक ऐकीव किस्सा आहे की  माझ्या सारख्या एका तरुणाने स्वत:च्या लग्नात देवाच्या प्रतिमा ऐवजी चक्क तलैवाची प्रतिमा ठेवली आणि त्यास साक्षी मानून लग्न केलं.
                      एवढं का बरे आम्ही देवास मानतो ? कारण हा देव आमच्यासाठी आमच्या एवढाच प्रामाणिक भक्त प्रेमी आहे. 'राघवेंद्र' नावाची एक सामाजिक संस्था आहे. "माझ्या मृत्युनंतर माझी सगळी संपती मी या राघवेंद्र संस्थेला देणार आहे. एकही रुपया माझ्या कुटुंबाला मिळणार नाही. तुमचीच संपत्ती तुमच्याच स्वाधीन करणार आहे". आमच्या तलैवाच वाक्य. एकदा बोलला की संपल. परंतु, जिवंतपणीच आमचा देवाने संपत्तीच कधीच गर्व केला नाही मिळाल त्यापेक्षा जास्त देणं हे तो त्याच कर्तव्य समजतो.
                     नुकताच काबालीच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा मलेशियातील एका मॉलमध्ये शूटिंगच काम चालू होत. बाहेर साधारणपणे पाच-सहा हजार भक्तगण दर्शनासाठी सकाळ पासून वाट बघत होते. तेही मलेशिया देशात  !!!  जेव्हा काम संपल तेव्हा संरक्षण सहकार्यानी त्यांना सुचवलं की आपण मागील मार्गाने जाऊ. तलैवाच प्रश्न का..? ही सगळी मंडळी माझ्यासाठी सकाळपासून उपाशी बसलेली आहेत. तर त्यांना न भेटता मला जेवण करण्याचा काय अधिकार ? आणि तो गर्दीतून सगळ्यांना भेटत निवासस्थानासाठी गेला. मलेशियात जेव्हा ते गेलेत तेव्हा त्याचं स्वागतासाठी तेथील सरकारनी दिमाखदार पाहुणचार केला. यापुर्वी असा पाहुणचार फक्त अमेरीकी अध्यक्ष ओबामा यांचा केला होता.
                    भारतातील शूटिंग दरम्यान एका गावात काम चालू होत. तलैवाला पाहून जवळपासच्या चार ते पाच गावातील मंडळी जमा दर्शनासाठी... दुसरा एखादा नट असला असता तर तो काम करून निघून गेला असता परुंतु हा आमचा देव आहे त्याने गर्दी वाढत आहे हे पाहून कामच थांबवलं आणि काय ? तर तो सगळ्या भक्तांना भेटत राहिला, सगळ्यांची विचारपूस करत त्यांच्या सोबत फोटो, ऑटोग्राफ देत राहिला.ही दर्शन रांग संपायला संध्याकाळ झाली परंतु आमचा देव दिवासभर उभा राहून भेटत राहिला. न थकता न थांबता. उत्साहाने आनंदाने !!! विशेष सांगण्या सारखं म्हणजे त्याने त्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करायला लावली आणि त्यांच्या सोबत त्याच जेवणाचा आस्वादही घेतला.
                         एकंदर म्हणजे काय आपला देव आपल्याला दु:खात पाहू शकत नाही. आपल्याच संप्रदायातील आणखी एक मोठ व्यक्तिमत्व आणि आपल्या देवाचे गुरुबंधु म्हणजे "कमल हसन सर". 'विश्वरुपम' चित्रपट पूर्ण करताना कमलसरांवर अशी वेळ आली की  त्यांना आपल्या राहत्या घरापासून सगळच बँकेकडे गहाण ठेवाव लागलं. पुढे त्या चित्रपटावर अनेक वाद उद्भवू लागले आणि चित्रपटावर बंदी होईल इतपर्यंत स्थिती वाईट झाली. अश्या वेळी चांगले-चांगले लोकं,नातेवाईक साथ सोडतात परंतु आमचा देव तलैवा तडक गेला कमल सरांच्या घरी आणि म्हणाला काळजी करू नको माझं घर, माझी जी काही संपती आहे ती तुझीच आहे आपण पुन्हा प्रयत्न करू, लढू. चिंता करू नको. पण तशी वेळच आली नाही चित्रपट रिलीज झाला आणि सुपरहिटही. कठीण काळात आपल्या माणसांची साथ न सोडणारा हा आपला देव.
                 रजनीकांत सरांची आणखी एक गोष्ट आहे जी बहुतेक जणांना माहित नाही. तलैवा हे फार अध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे ते नित्यपणे ध्यान साधना करतात. होय ! आणि त्यांना याचे बाळकडू लहानपणीच मिळालेले आहे. त्यांच्या मोठ्या भावांच्या आग्रहानुसार तलैवांच शालेय शिक्षण ''रामकृष्ण मठाच्या'' संचालित एका शाळेत झाला आहे. तेव्हा पासूनच त्यांना संस्कृत भाषा, वेद यांचा संस्कार मिळालेत. अभिनयाची सुरवात ही येथेच झाली,शाळेतील नाटकात ते एकलव्याची भूमिका बजावात असत.
                        तर असा हा आमचा देव भेटतो तरी कुठे ??? कुठेही !!! म्हणजे कुठेही.... बंगरूळूच्या कोण्या एका मंदिरात शांतपणे बसलेला असू शकतो किंवा चेन्नई मध्ये काम चालू असताना किंवा कोठे प्रवासाला जात असताना रस्त्याच्या कडेला थांबून जेवण करत असताना, स्वतःच ताट स्वतः धुवत असताना. एका साध्या कपड्यात लुंगी घालून बसलेला असताना....असाचं.
इतकी सामान्यपणे जीवन व्यतित करणारी ही 'असामी' आमचं आदर्श आहे, देव आहे यात काय हरकत ??? आम्हाला गर्व आहे आमच्या देवावर !! तलैवा ...!!!
(हा फोटो चेन्नईतील एका मॉलवर लावला आहे. १०० मीटर लांबीचा हा फलक त्या मॉलच्या मालकाने स्वखर्चाने लावला होता तेही एक वर्षापुर्वी .......... !!!!!!!!!!!!!!!!!!! )
आपणास कबाली दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....!a
(मुळ लेख २२ जुलै रोजी लिहिलेला आहे )

Comments

Popular posts from this blog

Think Out of The Box!

डेटा आणि आपण

व्यापार आणि भावना