दोन झाडं




              दोझाडं                



                 हि गोष्ट आहे दोन झाडांची. दोन्ही झाडं वेगळ्या प्रकारची, दोघांचा वैशिष्ट्य-गुणधर्म सारं काही वेगळं फक्त जातीन झाडं होती एवढंच. उदाहरणादाखल आपण एक झाडं कडुलिंब तर दुसरा बदामाचं समजुयात. दोघांच जन्म एकाच दिवशी एकाच वेळी झालं होतं. ‘रोपवयात’ दोघांना सारखाच वातावरण मिळालं. तोच सुर्य, तोच पाऊस, तीच मंद झुळूक हवा यांच्या आशीर्वादानं दोन्ही वाढली. पण यात बदामाच झाडं लवकर बहरायला लागलं. सगळे म्हणायला लागले की ‘किती छान वाढतंय हे बदामाच झाडं...! आणि हे काय कडुलिंबाचं कधी वाढणार काय माहित..? खरं तर दोन्ही झाडं वाढतच होती परंतु कडुलिंबाची वाढ हि सावकाश होत होती. आतातर बदामच झाड गोड-गोड बदाम पण द्यायला लागलं. असेच काही वर्ष सरून गेली. गावात एक दिवस वादळ आलं, मोठ्ठ वादळ. तुफान वारा, मुसळधार पाऊस. यात ते बदामाचं झाडं दुर्दैवाने उळमळून पडलं. फार वाईट झालं. पण या वादळात ते शेजारचं कडुलिंब मात्र टिकलं. कडुलिंब पुढे जोमाने वाढतच राहिलं. त्याच रुपांतर पुढे मोठ्या विस्तीर्ण झाडात झालं आणि पुढे कित्तेक वर्षे ते सर्वांना थंड सावली आणि शुद्ध हवा देत सेवा करीत राहिलं. अखंडपणे..!

                   आता या कथेचा आणि आपला काय संबंध ...? आता या झाडांना झाडं न समाजता आयुष्यातली तत्व समजा.(Principles) तर आपल्या आयुष्यात कोणती तत्व आहेत ..? आहेत की नाहीतच...??? आयुष्याची खरी लढाई तर इथेच आहे भाऊ...! आपल्या तत्वांवर-मान्यतांवर. आपल्या बौद्धिक, मनोकाईक जमिनीच्या मशागतीत आपण काय पेरतोय ??? दोन्ही झाडं तर चांगलीच आहेत, प्रत्येकाची निवड वेगळी वेगळी. आपले निर्णय हे काही क्षणांपुरते सीमित असतात की कायमचे ‘ठाम’ मार्गदर्शन करणारे असतात ..? या वादळी आयुष्यात जेव्हा कष्ट करायची वेळ येते तेव्हा आपण “शॉर्टकष्ट” तर नाही ना मारत आहोत आपण ??? या प्रश्नाच उत्तर प्रामाणिकपणे फक्त स्वत:लाच द्या बस..... मी पण हाच प्रयोग करतोय म्हणून हा इतका खटाटोप !! ‘’ नजदीक का फायदा सोचने से पहले दुरका नुकसान सोचना चाहिये...! ‘’(सरकार)

                  हीच तत्व असतील का हो, जी जिजांऊनी महाराजांना शिकवली व महाराजांनी शंभूराजांना जी गेली कित्तेक वर्षे पिढ्यानपिढ्या आम्हाला मार्गदर्शन करतायेत. काय फरक असेल त्या माणसात जो स्वतः तर आयुष्यात यशस्वी होतो परंतु त्याची पुढची पिढी नाही. जगाच्या कोपऱ्यात कितीतरी अशी लोकं जन्म घेतात-जगतात; जगताना कधीच त्यांना प्रसिध्द किंवा श्रीमंत व्हावसं वाटत नाही, कश्याचचं हव्यास नाही आणि मरताना देखील त्यांना समाधान वाटत असतं जगण्याचं.

               अशी कोणती “तत्वकिक’’ मिळाली असेल ‘आमटे’ परिवाराला जे या संसारसुखी उपभोगा मागे न धावता तिथे अतिशय दुर्गम भागात ‘निसर्गाची’ सेवा करण्यात गेली तीन पिढ्या ‘व्यस्त’ आहेत. ‘‘इथे नक्कीच विचार करण्या सारखे आहे की आपल्याला नक्की आयुष्यात काय हवंय आणि आयुष्याला नक्की आपल्या कडून काय हवंय ...?’’

                  आता हीच दोन झाडं आणि आम्हा तरुणांच आयुष्य. कोणी एक तरुण आयुष्यात लवकर वाढतो-सेट होतो. तर काहींची गती सावकाश ‘कडुलिंबा’ प्रमाणे. खर तर वाढ ही दोन्ही झाडांची होत असते, पण जेव्हा ‘कमपेरिजन’ चा प्रश्न येतो तेव्हा सगळी गफलत होते. तेही फक्त दुनियेच्या नजरेतून. कडुलिंब वाढत असतोच पण त्याची वाढ उंच होण्याआगोदर तो आपल्या “मुळा” मजबूत करत असतो. ‘लार्जर द्यान लाइफ जगण्यासाठी...!’ तुमच्या माझ्या सारख्या काही “कडुलिंबतरुणांची” वाढ सावकाश होत असली तरीही समजून घ्या की ‘प्रकृती’ ही आपल्या मुळा घट्ट करण्यासाठी प्रयत्न करतेय. जास्त काळ टिकण्यासाठी – लढण्यासाठी.
                   मला वयक्तीक रित्या दोन्ही झाडं मनापासून आवडतात. स्वतःला कोणताही झाडं समजा काही फरक पडत नाही. आयुष्याच्या या पथावर आपण तुफान अडचणी आल्यावर उळमळून पडतो की शांत – स्थिर उभे राहून सावली देतो ..? हे आपलं आपणचं ठरवावं. हा निर्णय आपणच घेऊ शकतो. आणि हे शक्य आहे शतप्रतिशत!!! असं नाही की लवकर वाढलेलं झाडं लवकरच पडेल पण वाढ कशीही असली तरीही आपली मुळ घट्ट असायला हवीतं इतकंच.

              प्रत्येकाचा आपला –आपला एक ‘टाईम झोन’ असतो. तोपर्यंत रोज एक रण काढायचा बसं ... एक दिवस नक्की शंभर होतीलच. टाईम झोनच म्हणालात तर ५ रणावर सिक्स मारण्यात आणि ९५ वर सिक्स मारण्यात फरक आहे. झाडांच एक वैशिष्ट असतं जेवढी त्यांची बाजु छाटली जातात तस ती आणखीनच उंच वाढतात. मग समजा कधी काळी आपल्याही बाजु छाटल्या गेल्या तर ओळखून घ्यायचं कि “ओझ कमी झालंय उंच उडण्यासाठी...!”

            तर मित्रांनो आयुष्यात दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा १) कधीच उमेद हरायचं नाही. २) गोष्ट नं-१ कधीच विसरायचं नाही. काय माहिती उद्याची येणारी सकाळ आपल्या साठी ‘अभुतपूर्व’ क्रांतीकारक असेलं......!!!


“मन सुद्द तुझ गोष्ट हाय प्रिथवी मोलाची, प्रिथवी मोलाची........  

तु चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची, परवा बी कोणाची .......”




Comments

Popular posts from this blog

Think Out of The Box!

डेटा आणि आपण

व्यापार आणि भावना