Posts

Showing posts from 2018

डेटा आणि आपण

Image
डेटा आणि आपण एक काळ होता जेव्हा फक्त आयटीचा ट्रेंड होता पण पुढील वीस वर्षे फक्त आणि फक्त "डेटा" चाच काळ असेल- जॅक मा हल्ली आपण ऐकतोय आधार डेटा लिक झाला, प्रायव्हसी हॅक, डेटा साठवणे, फेसबूक- केंब्रिज ऍनलॅटिक्स इत्यादी इत्यादी. पण नेमका डेटा म्हणजे काय??? सरळ शब्दांत काय झालं तर "माहिती"..! हो डेटा म्हणजे फक्त माहिती आणि ती गणिते स्वरूपात मांडणे म्हणजे ऍनलॅटिक्स. बर मग डेटा आणि आपला काय संबंध?? अहो तुमचीच माहिती म्हणजे डेटा.  आमची वैयक्तिक माहिती कुणाच्या कामाची?? आणि  आमची माहिती घेऊन ती लोकं काय लोणचं करणार आहे..? हो !!! तेही आंब्याचं ..! 2016 मध्ये एक प्रयोग फेसबुक ने चालू केला होता. आपले वैयक्तिक व्हाट्सअप नंबर आणि फेसबूक लींक करण्याचा. जसे आता इंस्टाग्राम फेसबुक आहेत तसेच. पण या प्रयोगाला भारतातून प्रचंड विरोध झाला. पुढे फेसबुक ने ही प्रक्रिया गुंडाळली. आपले वैयक्तिक मेसेज हवे तर कशाला त्यांना..? या "झुक्याला" आपल्यामध्ये इतका इंटरेस्ट काय आहे..? खरे सांगायचे झालं हा त्यांचा खरा व्यवसाय आहे.! आपल्या बद्दल माहिती मिळवायची आपल्या सवयी, आवडी, सहली,