Posts

Showing posts from September, 2021

अजेय

Image
  एक जातिवंत घोडा होता. अत्यंत रुबाबदार, उंच, पांढरा शुभ्र रंगाचा. मानेवरील मुलायम केसांपासून शेपटा पर्यंत अत्यंत विलोभनीय दिसणारा; जणू काही एक राजपुत्रच...! जसा दिसायचा त्याहून अधिक चपळतेने पळायचा अगदी वाऱ्याच्या वेगाने. या जगात त्याच्या सारखा घोडाच नाही. न भूतो न भविष्यती ! असा. नेहमी सरावात अव्वल राहणारा हा चेतक नेमका स्पर्धेत हारायचा. एकदा-दोनदा-पाचव्यांदा आता मात्र राजाला काही सहन होईना त्याने थेट तलवार उचलली आणि घोड्याचा डोकं आणि धड वेगळं करणार इतक्यात घोड्याची दैनंदिन देखभाल करणारा सेवक अत्यंत कळवळीने राजाची समजूत काढू लागला की कृपया, याला ठार नका मारू. फार विनवणी केल्यावर राजाने आदेश दिला, "जा घेऊन जा याला, माझ्या नजरे समोरून आणि तुलाही राज्यातून बेदखल करण्यात आले आहे." तो सेवक घोड्याला घेऊन राज्याचा सीमेवर एका गावात राहू लागला. रोज करायचा तसाच नित्य नियमाने घोड्याची देखभाल करू लागला. अशीच काही वर्षे गेली. आता पंचक्रोशीत एका नव्या घोड्याची चर्चा सुरू झाली. एक असामान्य घोडा जो कधीच हरत नाही. प्रत्येक स्पर्धेत अव्वल येतो म्हणजे येतोच. या जगात याला हरवणारा