अजेय

 

एक जातिवंत घोडा होता. अत्यंत रुबाबदार, उंच, पांढरा शुभ्र रंगाचा. मानेवरील मुलायम केसांपासून शेपटा पर्यंत अत्यंत विलोभनीय दिसणारा; जणू काही एक राजपुत्रच...! जसा दिसायचा त्याहून अधिक चपळतेने पळायचा अगदी वाऱ्याच्या वेगाने. या जगात त्याच्या सारखा घोडाच नाही. न भूतो न भविष्यती ! असा.

नेहमी सरावात अव्वल राहणारा हा चेतक नेमका स्पर्धेत हारायचा. एकदा-दोनदा-पाचव्यांदा आता मात्र राजाला काही सहन होईना त्याने थेट तलवार उचलली आणि घोड्याचा डोकं आणि धड वेगळं करणार इतक्यात घोड्याची दैनंदिन देखभाल करणारा सेवक अत्यंत कळवळीने राजाची समजूत काढू लागला की कृपया, याला ठार नका मारू. फार विनवणी केल्यावर राजाने आदेश दिला, "जा घेऊन जा याला, माझ्या नजरे समोरून आणि तुलाही राज्यातून बेदखल करण्यात आले आहे."

तो सेवक घोड्याला घेऊन राज्याचा सीमेवर एका गावात राहू लागला. रोज करायचा तसाच नित्य नियमाने घोड्याची देखभाल करू लागला. अशीच काही वर्षे गेली. आता पंचक्रोशीत एका नव्या घोड्याची चर्चा सुरू झाली. एक असामान्य घोडा जो कधीच हरत नाही. प्रत्येक स्पर्धेत अव्वल येतो म्हणजे येतोच. या जगात याला हरवणारा कोणताच घोडा नाही. हा घोडा हरणे शक्यच नाही. अजेय!!!

या अजेय घोड्याची चर्चा राजा पर्यंत पोहचली. त्यांनी राज्यात होणाऱ्या स्पर्धेत त्या घोड्याला आमंत्रित केलं. स्पर्धा सुरू झाली काय रुबाबदार घोडा होता तो, सर्वांची नजर त्या घोड्यावरून काही हटेना. स्पर्धा सुरू झाली. तो घोडा पळाला; पळाला म्हणजे काय तर तो वाऱ्याच्याही वेगाने स्पर्धा जिंकली. अजेय घोड्याची चाल, डोळे, अदा, वेग, दिसणं सगळंच नेत्रदीपक होतं. स्पर्धा सोहळ्यात रूपांतर झाली होती पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांच्या नयनातून हृदया पर्यंत झिरपून चित्ततृप्त करणारा हा क्षण होता. अगदी अमृत चाखल्याची जाणीव प्रत्येकाला होत होती.

राजाला तर काही सुचेचना हर्ष उल्हासित होऊन त्याने अजेय घोड्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले आणि त्याची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सत्कारासाठी मंचावर आमंत्रित केलं. इतका वेळ मागे कुठेतरी नजर चुकवून बसलेल्या सेवकाला आता मात्र ना ईलाज झाला. आदेश राजाचा होता. मंचावर आलेल्या व्यक्तीला पाहून सगळेच आश्चर्य चकित झाले. कारण, हा सेवक म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नसून चेतक घोड्याचा सेवक होता. ज्याला काही वर्षांपूर्वी राजांनी बहिष्कृत केलं होतं.
राजांनी सन्मानपूर्वक त्याची विचारणा केली. अगदी नम्रपणे सेवकाने आणखी एक धक्का दिला म्हणाला "राजे, हे तर तुमच्याच मालकीचे चेतक घोडे आहे...!"
काय चेतक..? पण हे "अजेय" कसे झाले..?

सेवकांनी खुलासा केला की त्यांना शिक्षा दिल्यावर एका विराण ठिकाणी राहून; तो घोड्याची नेहमी प्रमाणेच देखभाल करायचा. पण, यात एक बदल सातत्याने केला, तो म्हणजे मी रोज चेतक च्या कानात जाऊन सांगायचो, मनाच्या अत्यंत नितळ स्थानातून त्याला साद द्ययचो.... " तू अजेय आहेस... अजेय...! तुझा जन्म फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच झाला आहे. तू विश्वविक्रमवीर आहेस! बास हळू हळू चेतक चे अजेय मध्ये रूपांतर झाले.
आपल्यातील प्रत्येक जण चेतक आहेच पण अजेय बनण्याच्या प्रोसेस मध्ये स्वतःच स्वतःला हरवून बसतो.
आणि खरी मेखं काय माहिती..?
आपणच राजा आहोत, सेवकही आपणच आणि पळणारा घोडाही!!! चूक-बरोबर ठरवणारे, शिक्षा देणारे-भोगणारे अन प्रेरणा देणारे - पुन्हा उभे राहणारे ही आपणच.
आपल्याच मनाच्या तळातून आपल्यालाच सूचना द्यायचे आहे. "तू करू शकतोस बेटा... नव्हे तर फक्त तूच हे करू शकतो" You can Do it... & You will again n again !
तुम्ही त्या दिव्य अमृताचे पुत्र आहात एवढेच नव्हे तर स्वतः अमृत आहात. हे वारंवार आपणच आपणांस सांगायला हवे.
जगाचं पोषण करणाऱ्या सूर्याचा एक तुकडा आपल्याही हृदयात आहे याची जाणीव झाल्यावर आयुष्याच्या रोजच्या अडचणींना आपण पुरून उरू. न्यूनगंड, सेल्फ डाऊट असा विरघळून जाईल की.......................

 
All

Comments

Popular posts from this blog

Think Out of The Box!

डेटा आणि आपण

युवराज सिंग