युवराज सिंग

प्रिय मित्र युवराज सिंग 


 तू आलास तेव्हा नुकतच कुठे भारतीय क्रिकेट उमलत होतं... नजरेत नजर मिळवायची हिंमत दाखवत होतं.... डिफेन्स करत मैदानावर टिकणे शिकत होतं.... आणि आत्ता कुठे शंभरच्या स्ट्राईक रेटने धावत होतं. मग तू आलास!!! (हे वाक्य एमएस धोनी सिनेमाप्रमाणे “फिर आता है युवराज सिंग” अशा ट्यून मध्ये फिल कराव) युवराज...!!!!!!!
           ज्यांनी क्रिकेट जन्माला घातलं त्यांच्या नजरेला नजर भिडून हम भी है जोश में म्हणत त्यांच्याच लॉर्डसवर 300 प्लस चेस करून “दादाला” टी-शर्ट काढून फिरवयाची संधी मिळवून दिलीस...! तू अख्खा जगाला सांगितलं “ये नया इंडिया है... ये चेस भी करेगा और आंखोसे आंख भी मिलायेगा...!” शंभरच्या स्ट्राइक मध्ये धन्य माणनाऱ्या टीम इंडियाला तू ‘एकशे पन्नास’ च्या गतीने धावायला लावलंस!  जॉन्टी रोड्स चे बरेच किस्से आम्ही ऐकायचो; पण खरा जॉन्टी आम्हाला तुझ्या रुपाने मैदानात दिसला आणि आम्ही ही तुझ्यासारखे कॅच पकडण्याच्या प्रयोगात हात पाय मोडून घेतले. परंतु तू थांबला तरी त्या क्षेत्रातून बॉल सीमेकडे जाणार नाही या शाश्वातीने भारताची बॉलिंग लायनप सुधारत गेली. ती आज जगात अव्वल स्थानावर आहे. ते फक्त तुझ्या फिल्डिंग ची कमाल आहे. तू जेव्हा पहिले शतक झळकवलास तेव्हा मला वाटलं होतं की किती उशिराने शतक केला आहे. पण शतका अगोदर तु केलेल्या मॅच विनिंग कामगिरी पाहून छाती अभिमानाने भरून गेली तेही सहाव्या-सातव्या स्थानावर येऊन. 

“सचिन कितीवर आहे...?” असं विचारणाऱ्या पिढीला तू “युवराज आहे ना..?   सं विचारायला भाग पाडलंस. तू क्रीजवर नुसता असलं तरी आमच्यासाठी “बास” असायचा.. तु आहेस म्हणजे अख्ख्या भारताची निश्चिंती... तू आहेस म्हणजे विश्वास होता.. “विश्वास” विश्वास हाच शब्द तुझ्यासाठी अगदी समर्पित आहे. सचिन-राहुल-सौरव या दिग्गजांच्या पिढीमध्ये तू आम्हाला, आमचा आपला माणूस वाटायचा. ज्या व्यक्तीच्या मागे गॉसिप होत नाही. अशा फार कमी प्राण्यांपैकी तू एक आहेस. ड्रेसिंग रूम पासून ते प्रत्येक क्रिकेटप्रेमींसाठी तू आपला हक्काचा माणूस वाटतो नेहमीच आणि आजही.
         मध्यंतरी “मेंढीस” नावाच्या प्रयोगाने अख्खं क्रिकेटजग टेन्शनमध्ये पडलं होतं. पण सचिन बरोबर बोलता बोलता तुला काहीतरी सूचतं .. आणि ते तू उद्याच्या मॅचमध्ये वापरतो. आणि त्या दिवसापासून त्या मेंढीसचा कोणीही यावं आणि टपली मारून जावे अशी गत झाली त्याची. गोऱ्या लोकांनी आपली कमजोरी ओळखत नेहमी स्लेजिंग करत भडकवायचं आणि भारतीयांची विकेट घ्यायची असं सर्रास घडतं. पण तू “रसायनच” वेगळा आहेस. तुला स्लेज केलं की तू भडकायचा खरा पण त्याचा परिणाम छक्के मारून शांत व्हायचं. बरं ज्या स्टूअर्ट ब्रॉड ला एका ओव्हरमध्ये ‘सहा सिक्स’ मारलेस ते पोरगं काही दिवस मानसिक तणावात होतं रे... कारण, ज्या क्षणी तू त्याची धुलाई केली तेव्हा तो आइसिसी रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर होता. दोन महिने त्याला मानसोपचार तज्ञाकडे जावं लागायचं.
                                  सर्वच खेळाडू प्रमाणे तुझी ही ‘गती’ काही काळासाठी धिमी झाली, फासे बरोबर पडत नव्हते. तेव्हा तुझ्या आवडत्या सचिन पाजीनी तुला सांगितलं की थोडा वेळ घे आणि बॉलिंग वर लक्ष केंद्रित कर. तुझ्याकडे दैव कृपेने ‘अचाट एकाग्रता’ आहे. एखादी गोष्ट मिळवायची म्हणजे तू मिळतोच. तुझ्या बॅटिंग आणि फिल्डिंग तृप्त झालेल्या रसिकांना तू  आता बॉलिंग नेही घायाळ करत होतास. २०११चा वर्ल्डकप फक्त आणि फक्त तुझ्या बॉलिंगमुळे मिळाला आहे याची जाणीव प्रत्येकाला आहेच. अहमदाबादेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत नाबाद ५७* रन हे माझ्यासाठी नेहमीच खास आहे.
       आयुष्य आपल्याला कधीकधी थांबायला सांगतं तसे सिग्नल देत असतं पण तुझी क्रिकेट भूक एवढी कि ती थांबायलाच तयार नाही...  कसे थांबणार??? तुझ्या शरीरात रक्ता ऐवजी क्रिकेटचं पाणी धावत असेल ना? आणि या सगळ्या धावपळीत तुला कॅन्सर नावाचा फडतुस आजार झाला. हो तुझ्या पुढे ते फडतुसच....! त्या जीवघेण्या आजाराला ही कव्हर ड्राईव्ह करत तू परत आलास मैदानात...  नुसता आला नाहीत तर तुझ्या सर्वोच्च 150 धावा काढून दाखवलं की मी अजून संपलो की नाही ते तुम्ही नाही ठरवायचं. “मी आहे माझा राजा. मी आहे युवराज सिंग. किंग ऑफ सिक्सर...”

         तुझ्या दिलखुलास शैलीने जगणारा तू... तुझं आणि इंग्लंडचा नातं हे काही वेगळच आहे नेहमी त्यांच्याविरुद्ध कच्चून खेळणारा शेवटी त्यांचीच मुलगी आपल्या घरी सुनं म्हणून आणलीस आणि त्या इंग्रजांच पण काळीज तू जिंकलं.
‘अंडर प्रेशर’ नावाचा एक प्रकार असतो क्रिकेटमध्ये... तुला कदाचित ते माहित नसेल पण तू जेव्हा जेव्हा मैदानात उतरला तेव्हा तेव्हा समोरची टीम आत्ताही प्रचंड प्रेशर खाली येते. हाच तुझा दबदबा... हाच तुझा रुबाब... हाच तुझा तोरा आणि तू असाच !!!
ग्रेट क्रिकेटर वगैरे ठीक आहे पण तू लिजेंड वगैरे नाहीस. आमच्या ह्रीदयातला युवराज आहेत. आमच्या हक्काचा-आपला माणूस आहेस. तुझ्याबरोबर गळ्यात गळे घालून आम्ही गप्पा मारू शकतो.. सहज मिठी मारू शकतो.. खट्याळपणा करू शकतो... भन्नाट काहीतरी करण्याचा विचार करू शकतो... मित्रा तू असाच राहा. तू म्हणजे आम्हा मित्रांना विश्व आहेस. सचिन-राहुल ताऱ्यांना स्पर्श न करू शकणाऱ्या  आजच्या नव्या पिढीतला “दुवा” आहेस तू... तू असाच स्वच्छंदपणे आयुष्य जग. आणि आम्हाला असाच “दीपस्तंभ” बनून प्रेरणा देत रहा हीच सदिच्छा !!!

 धन्यवाद युवराज !
तुझ्याच पिढीतला पण तुला पाहून घडणारा एक तरुण.
nagesh Buddhe
 

08June, 2019
 

 




Comments

Popular posts from this blog

Think Out of The Box!

डेटा आणि आपण

व्यापार आणि भावना