कर्मयोग...

कर्मयोग विचारात घेताना भारताचे संत गुरुदेव श्रीरामकृष्ण यांचे स्मरण येणे अनिवार्यच आहे. कितीही आदर भाव जागृत असला तरी स्वामी विवेकानंद हे एक मित्राप्रमाणे वा जेष्ठ बंधू वाटतात आणि ठाकुरजींच्या प्रति फक्त आणि फक्त गुरुदेव अशीच प्रतिमा मनात ठासते. एका अत्यंत गरीब घरात जन्मलेले रामकृष्ण हे सर्वांना कालिमाते चे पुजारी म्हणून एक भक्ती योगी वाटतात. खरे तर प्रत्येक योगात (कर्म,भक्ती,ज्ञान,राज) कर्म करणे अनिवर्याच आहे. लहानपणा पासूनच काली मातेची ओढ लागलेली असताना वंश परंपरे प्रमाणे ते त्यांच्या गावा जवळील एका मंदिरात पुजाऱ्याची नोकरी करीत असत. साधारणतः दहा-बारा वर्षे वय होते त्यांचे. पण, या कालीची सेवेतही त्यांना आता भान राहत नसे. त्यांना त्या परम तत्वाचे, आनंदाचे दर्शन घेण्याची ओढ सतावत होती. आणि आता ते पूर्ण वेळ साधानेसाठी त्या मंदिराच्या पायथ्याशी गंगेच्या किनारी एक कुटी बांधून वास्तव्यकरण्यास सुरुवात केली. श्रीरामकृष्णांनी त्या एकाच ठिकाणी बसून यत्नांचे यज्ञ केले. आणि त्यांना त्या दिव्यअनुभूती चे ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या त्या कर्मात एवढी ताकद होती की त्याच ठिकाणी वेळोवेळी श्रेष्ठ हुन श्रेष्ठ गुरूनी त्यांना इथेच येऊन शिकवले. त्या परम आनंदासाठी ते कुठेही अरण्यात अथवा हिमालयात गेले नाहीत. कोणत्याही गुरू कडे न जाता ते गुरुच त्यांच्यापर्यंत पोहचले. ही आहे कर्माची ताकद. 
लहानपणीच त्यांच्या विवाह दुसऱ्या गावातील शारदा(सारदा) बरोबर झाले होते. जेव्हा वयात आल्यावर त्या मुलीला कळाले की तीचा पती वेड्यागत एकटाच नदी किनारी राहत आहे. तेव्हा त्या एकट्याच पतीच्या दर्शना साठी आल्या. त्यांना पाहून त्या माऊलीच्या लक्षात आले की आता आपला पती हा आपला राहिला नसून ते त्या परम भक्तीत लीन झाले आहेत. तद क्षणापासून शारदामातेनी त्यांना संसारात न ओढता पत्नी धर्म म्हणून रोज दोन वेळेचे जेवण देण्यापासून पतीची सेवा केली व पुढे जाऊन त्या परमहंसांचे प्रथम व परमशिष्य बनल्या आणि या भारताचे कल्याण झाले. कर्मयोग पाहता परमहंसां पेक्षा शारदामाता श्रेष्ठ ठरतात. 


अशी रियल लाईफ उदाहरणे पचवायला थोडी जड जातात; म्हणून महाभारत सारख्या कथेची निर्मिती केली असावी. (असे मला वाटते.)
महाभारतातील एक उत्तम पात्र म्हणजे राजमाता गांधारी. दुर्योधन सारखा दिव्यपुत्र प्राप्त असूनही कर्मानेही अंध असलेला पती धुतराष्ट्र व प्रतिशोधात आयुष्य करपून घेतलेला तिचा बंधू शकुनी या मुळे तिला आयुष्यभर सुख प्राप्त झाले नसावे. आपला पती अंध आहे म्हणून या माता आयुष्यभर नेत्र न उघडता डोळ्यावर पट्टीबांधून मनोमन भगवान शंकराची आराधना करायच्या. या त्यांच्या कर्मयोगाने त्यांच्या नेत्रात दिव्य शक्ती तयार झाली. ज्या कोणावर त्यांची दृष्टी पडेल तो अमर होईल अशी ऊर्जा सामावली होती. महाभारताच्या १७ व्या दिवशी युद्ध कौरव हरणार असे जवळजवळ निश्चित झाल्यावर त्यांनी रात्री दुर्योधनास तू माझ्या पोटी जसा जन्माला होतास तसाच निवस्त्र ये म्हणून आदेश देतात. सरोवरातून अंघोळ करून तसाच परतनारा दुर्योधन कृष्णाला दिसतो इथे कृष्ण कपट करून दुर्योधनाला काहीतरी अंगावर ओढून घे... तू काय आता बालक आहेस का म्हणून हिणावतो.
या संभ्रमात दुर्योधन झाडांचे काही पाने कमरे भोवती ओढून घेऊन जातो. माता गांधारी जवळ पोहचताच. राजमातांनी आयुष्यात एकदाच आपले नेत्र उघडले; त्यानेत्रातून दिव्यशक्ती बाहेर पडून दुर्योधनाचे शरीर अजेय होऊन जाते फक्त तेवढी झाकलेले शरीर सोडून. दुसऱ्या दिवशी म्हणजे १८व्या दिनी नियम तोडून भीम दुर्योधनाच्या कमरेखाली जांघेवर हल्ला करून त्याची हत्या करतो. 
आयुष्यभर कर्माचे संचित कारण्यानेच त्यांना ही दिव्यशक्ती प्राप्त झाली होती. 

आता याहून थोडे सोप्पे उदाहरण...
आपल्या पतीच्या हत्येचा प्रतिशोध घेण्यासाठी देवसेना बंदी असूनही वाळलेल्या झाडाच्या काट्या-कुट्या जमवून एका ठिकणी साचवत असते. गेली २५ वर्षी ही ते कर्म करीत असताना शेवटी तिचा मुलगा महेंद्र बाहुबली येऊन दुष्ट भल्लाल देवाला याच कुंडात अग्नी देऊन ठार करतो. हे ही एक निश्चय तप/कर्मयोगाचे फळ आहे.....! 
लक्षात आले का...? 😄

आपल्या सर्वाना ट्रेकिंगची विशेष आवड असते. पर्वत माथा पहिला तर वर जाऊ का मधेच कुठंतरी मरून जाऊ..? अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. या चिंतेकडेलक्ष न देता आपण एक एक पाऊल टाकत मार्गक्रमण करीत जायचे. मी पोहाचेन की नाही..? माथ्यावरून ते सुंदर स्वर्गाची अनुभूती मिळेल की नाही...? अबाबा.. एवढं मोठं डोंगर चढायचं आहे का..? किती वेळ लागेल...? माझं आयुष्य निघून जाईल की यातच .?? असे त्या डोंगरापेक्षा मोठे आसक्तीचे ओझे घेऊन चालू लागलो तर प्रत्येक पाऊल जड होत जाणार व आपण लवकरच थकून जाऊ. म्हणून अश्या विचारांचे जाळे दुर फेकून फक्त आनंदाने "योग: कर्मसु कौशलम् ।" करत प्रत्येक पाऊल आनंदाने, वर्तमानाचे अनुभूती घेत चालू लागलो तर आपण डोंगर कधी सर करु हे कळणारच नाही. 
आणि असेही आपल्याला फळ मिळणारच आहे हा एकमेव या सृष्टीचा नियम आहे. मग एवढी आसक्ती का..? तो पर्यन्त चरैवती...   चरैवती... चरैवती...।

अशी आहे कर्माची जादू....!!!

Comments

Popular posts from this blog

Think Out of The Box!

डेटा आणि आपण

व्यापार आणि भावना