Wednesday, 9 November 2016

दोन झाडं
              दोझाडं                                 हि गोष्ट आहे दोन झाडांची. दोन्ही झाडं वेगळ्या प्रकारची, दोघांचा वैशिष्ट्य-गुणधर्म सारं काही वेगळं फक्त जातीन झाडं होती एवढंच. उदाहरणादाखल आपण एक झाडं कडुलिंब तर दुसरा बदामाचं समजुयात. दोघांच जन्म एकाच दिवशी एकाच वेळी झालं होतं. ‘रोपवयात’ दोघांना सारखाच वातावरण मिळालं. तोच सुर्य, तोच पाऊस, तीच मंद झुळूक हवा यांच्या आशीर्वादानं दोन्ही वाढली. पण यात बदामाच झाडं लवकर बहरायला लागलं. सगळे म्हणायला लागले की ‘किती छान वाढतंय हे बदामाच झाडं...! आणि हे काय कडुलिंबाचं कधी वाढणार काय माहित..? खरं तर दोन्ही झाडं वाढतच होती परंतु कडुलिंबाची वाढ हि सावकाश होत होती. आतातर बदामच झाड गोड-गोड बदाम पण द्यायला लागलं. असेच काही वर्ष सरून गेली. गावात एक दिवस वादळ आलं, मोठ्ठ वादळ. तुफान वारा, मुसळधार पाऊस. यात ते बदामाचं झाडं दुर्दैवाने उळमळून पडलं. फार वाईट झालं. पण या वादळात ते शेजारचं कडुलिंब मात्र टिकलं. कडुलिंब पुढे जोमाने वाढतच राहिलं. त्याच रुपांतर पुढे मोठ्या विस्तीर्ण झाडात झालं आणि पुढे कित्तेक वर्षे ते सर्वांना थंड सावली आणि शुद्ध हवा देत सेवा करीत राहिलं. अखंडपणे..!

                   आता या कथेचा आणि आपला काय संबंध ...? आता या झाडांना झाडं न समाजता आयुष्यातली तत्व समजा.(Principles) तर आपल्या आयुष्यात कोणती तत्व आहेत ..? आहेत की नाहीतच...??? आयुष्याची खरी लढाई तर इथेच आहे भाऊ...! आपल्या तत्वांवर-मान्यतांवर. आपल्या बौद्धिक, मनोकाईक जमिनीच्या मशागतीत आपण काय पेरतोय ??? दोन्ही झाडं तर चांगलीच आहेत, प्रत्येकाची निवड वेगळी वेगळी. आपले निर्णय हे काही क्षणांपुरते सीमित असतात की कायमचे ‘ठाम’ मार्गदर्शन करणारे असतात ..? या वादळी आयुष्यात जेव्हा कष्ट करायची वेळ येते तेव्हा आपण “शॉर्टकष्ट” तर नाही ना मारत आहोत आपण ??? या प्रश्नाच उत्तर प्रामाणिकपणे फक्त स्वत:लाच द्या बस..... मी पण हाच प्रयोग करतोय म्हणून हा इतका खटाटोप !! ‘’ नजदीक का फायदा सोचने से पहले दुरका नुकसान सोचना चाहिये...! ‘’(सरकार)

                  हीच तत्व असतील का हो, जी जिजांऊनी महाराजांना शिकवली व महाराजांनी शंभूराजांना जी गेली कित्तेक वर्षे पिढ्यानपिढ्या आम्हाला मार्गदर्शन करतायेत. काय फरक असेल त्या माणसात जो स्वतः तर आयुष्यात यशस्वी होतो परंतु त्याची पुढची पिढी नाही. जगाच्या कोपऱ्यात कितीतरी अशी लोकं जन्म घेतात-जगतात; जगताना कधीच त्यांना प्रसिध्द किंवा श्रीमंत व्हावसं वाटत नाही, कश्याचचं हव्यास नाही आणि मरताना देखील त्यांना समाधान वाटत असतं जगण्याचं.

               अशी कोणती “तत्वकिक’’ मिळाली असेल ‘आमटे’ परिवाराला जे या संसारसुखी उपभोगा मागे न धावता तिथे अतिशय दुर्गम भागात ‘निसर्गाची’ सेवा करण्यात गेली तीन पिढ्या ‘व्यस्त’ आहेत. ‘‘इथे नक्कीच विचार करण्या सारखे आहे की आपल्याला नक्की आयुष्यात काय हवंय आणि आयुष्याला नक्की आपल्या कडून काय हवंय ...?’’

                  आता हीच दोन झाडं आणि आम्हा तरुणांच आयुष्य. कोणी एक तरुण आयुष्यात लवकर वाढतो-सेट होतो. तर काहींची गती सावकाश ‘कडुलिंबा’ प्रमाणे. खर तर वाढ ही दोन्ही झाडांची होत असते, पण जेव्हा ‘कमपेरिजन’ चा प्रश्न येतो तेव्हा सगळी गफलत होते. तेही फक्त दुनियेच्या नजरेतून. कडुलिंब वाढत असतोच पण त्याची वाढ उंच होण्याआगोदर तो आपल्या “मुळा” मजबूत करत असतो. ‘लार्जर द्यान लाइफ जगण्यासाठी...!’ तुमच्या माझ्या सारख्या काही “कडुलिंबतरुणांची” वाढ सावकाश होत असली तरीही समजून घ्या की ‘प्रकृती’ ही आपल्या मुळा घट्ट करण्यासाठी प्रयत्न करतेय. जास्त काळ टिकण्यासाठी – लढण्यासाठी.
                   मला वयक्तीक रित्या दोन्ही झाडं मनापासून आवडतात. स्वतःला कोणताही झाडं समजा काही फरक पडत नाही. आयुष्याच्या या पथावर आपण तुफान अडचणी आल्यावर उळमळून पडतो की शांत – स्थिर उभे राहून सावली देतो ..? हे आपलं आपणचं ठरवावं. हा निर्णय आपणच घेऊ शकतो. आणि हे शक्य आहे शतप्रतिशत!!! असं नाही की लवकर वाढलेलं झाडं लवकरच पडेल पण वाढ कशीही असली तरीही आपली मुळ घट्ट असायला हवीतं इतकंच.

              प्रत्येकाचा आपला –आपला एक ‘टाईम झोन’ असतो. तोपर्यंत रोज एक रण काढायचा बसं ... एक दिवस नक्की शंभर होतीलच. टाईम झोनच म्हणालात तर ५ रणावर सिक्स मारण्यात आणि ९५ वर सिक्स मारण्यात फरक आहे. झाडांच एक वैशिष्ट असतं जेवढी त्यांची बाजु छाटली जातात तस ती आणखीनच उंच वाढतात. मग समजा कधी काळी आपल्याही बाजु छाटल्या गेल्या तर ओळखून घ्यायचं कि “ओझ कमी झालंय उंच उडण्यासाठी...!”

            तर मित्रांनो आयुष्यात दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा १) कधीच उमेद हरायचं नाही. २) गोष्ट नं-१ कधीच विसरायचं नाही. काय माहिती उद्याची येणारी सकाळ आपल्या साठी ‘अभुतपूर्व’ क्रांतीकारक असेलं......!!!


“मन सुद्द तुझ गोष्ट हाय प्रिथवी मोलाची, प्रिथवी मोलाची........  

तु चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची, परवा बी कोणाची .......”
Monday, 7 November 2016

"फॅनधर्म"

                                    "फॅनधर्म"
भारतात अनेक धर्म आहेत, त्यापेक्षा जास्त जाती-पोटजाती, भाषा आणि देवदेवतांच तर विचारूच नका. खर तर एका अंगाने बघितलं तर आम्हाला 'विभागून' घेणेच आवडत म्हणा. मी अमका तू तमक्या चा......
            परंतु या सर्व धर्मानां पुरून उरणारा अजून एक धर्म आहे, "फॅनधर्म"...... !!!! होय, फॅनधर्म किंवा फॅनीजम. आपल्याला कल्पना असो व नसो आपण कमी अधिक प्रमाणात या धर्मात मोडतोच. धर्म आला म्हणजे देव आलाच! येथे मात्र देवाबद्दल गफलत नाही येथे फक्त एकच देव आहे..... होय एकचं देव ... आमचा तलैवा आपला रजनीकांत.... या धर्मांची व्याप्ती फारच मोठी आहे. भारतातील दक्षिणेत याचा प्रभाव जास्त असला तरी या धर्माचे अनुयायी जगभर पसरलेले आहेत. उगीच सांगत नाही तसा पुरावाच आहे माझ्याकडे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या नोंदीत आहे की  जगात सगळ्यात जास्त चाहतावर्ग (फॅन फोलोविंग) सुपरस्टार रजनीकांत यांचा आहे. तसा रेकॉर्डच केला आहे आम्ही!!!
गल्लीतल्या कट्ट्यावर चर्चा चालू असताना कोणी म्हणाला कि आपल्याला पण 'तेंडुलकर' आवडतो तर आपण दोघे चांगले मित्र होऊ, पण कोणी म्हणाला की "मी पण तलैवाचा फॅन आहे" तर ते दोघे जीवाभावाचे सख्खे भाऊ होऊन जातात. हीच तर ताकद आहे आमच्या देवाची. तुम्ही मी नाही तर बरेच मोठमोठी व्यक्तिमत्व सुध्दा आमच्या धर्मात मोडतात, जसे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. खरं आहे मित्रानो जेव्हा २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळत मोदी साहेब देशभर फिरत होते तेव्हा ते जेथे जेथे जात त्या गावातील मोठमोठी लोकं त्यांना भेटायला येत परंतु जेव्हा ते दक्षिणेत गेले तेव्हा ते स्वत:च पोहोचले आमच्या देवाच्या घरी तेही पांढरी 'लुंगी' घालून !! आठवलं का  ??...... कळालं  का आमच्या धर्माची ताकत ?
                       गेली चार दशकं तलैवा आमचं मनोरंजन करीत आहे पण आम्हा भक्त जणांना तो एकाच अवतारात आवडतो त्याने वयस्कर भुमिका करणे आम्हास मुळात खपतचं नाही तो नेहमी तरुणच राहणार आहे अशी आम्हाला आशा असते. आम्ही इतके देव वेडे आहोत कि विचारू नका, एका चित्रपटात आमचा देव शेवटी भुमिकेत मरतो; आम्हाला खपलचं नाही....जाळली सगळी चित्रपटगृहे ! नंतर तो शॉट कट करून पुन्हा प्रदर्शित झाला तो चित्रपट. देवाला फक्त आभासी दुनियेत पाहण्यासाठी आमची दोन-दोन दिवस रांग लागली चित्रपटगृहाबाहेर (शिवाजी द बॉस ) आणि आम्हाला अपेक्षा तरी काय ?? तर पूर्ण चित्रपटात देवाने त्याचा खास शैलीत एकदा काय पाय फिरवून बसला आणि हसला कि झालं... आम्ही तो चित्रपट पुन्हापुन्हा पाहू. मन तृप्त होई पर्यंत. इतकचं..! २२ जुलैला देवाचा कबाली चित्रपट येतोय संपूर्ण जगभर; विविध भाषेत. चेन्नईतील बऱ्याच व्यावसाईक कंपन्यांनी त्या दिवशी सुट्टी घोषित केली आहे. 'इतिहासात प्रथमच अस घडतंय कि चित्रपट पाहण्यासाठी खास विमान सेवा देण्यात येणार आहे'. एयर एशिया या विमान कंपनीने चित्रपट पाहण्या सठी आम्हा धर्म बांधवाना माफत दरात बेंगळूरू ते चेन्नई असा खास प्रवास सेवा देणार आहे. आम्ही आमच्या देवाची पुजा करतो, अभिषेक, हार, कट आउट, मंदिर, देवाच्या नावाने सामाजिक संस्था, सामाजिक कार्य काय काय म्हणुन विचारू नका सगळच. एक ऐकीव किस्सा आहे की  माझ्या सारख्या एका तरुणाने स्वत:च्या लग्नात देवाच्या प्रतिमा ऐवजी चक्क तलैवाची प्रतिमा ठेवली आणि त्यास साक्षी मानून लग्न केलं.
                      एवढं का बरे आम्ही देवास मानतो ? कारण हा देव आमच्यासाठी आमच्या एवढाच प्रामाणिक भक्त प्रेमी आहे. 'राघवेंद्र' नावाची एक सामाजिक संस्था आहे. "माझ्या मृत्युनंतर माझी सगळी संपती मी या राघवेंद्र संस्थेला देणार आहे. एकही रुपया माझ्या कुटुंबाला मिळणार नाही. तुमचीच संपत्ती तुमच्याच स्वाधीन करणार आहे". आमच्या तलैवाच वाक्य. एकदा बोलला की संपल. परंतु, जिवंतपणीच आमचा देवाने संपत्तीच कधीच गर्व केला नाही मिळाल त्यापेक्षा जास्त देणं हे तो त्याच कर्तव्य समजतो.
                     नुकताच काबालीच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा मलेशियातील एका मॉलमध्ये शूटिंगच काम चालू होत. बाहेर साधारणपणे पाच-सहा हजार भक्तगण दर्शनासाठी सकाळ पासून वाट बघत होते. तेही मलेशिया देशात  !!!  जेव्हा काम संपल तेव्हा संरक्षण सहकार्यानी त्यांना सुचवलं की आपण मागील मार्गाने जाऊ. तलैवाच प्रश्न का..? ही सगळी मंडळी माझ्यासाठी सकाळपासून उपाशी बसलेली आहेत. तर त्यांना न भेटता मला जेवण करण्याचा काय अधिकार ? आणि तो गर्दीतून सगळ्यांना भेटत निवासस्थानासाठी गेला. मलेशियात जेव्हा ते गेलेत तेव्हा त्याचं स्वागतासाठी तेथील सरकारनी दिमाखदार पाहुणचार केला. यापुर्वी असा पाहुणचार फक्त अमेरीकी अध्यक्ष ओबामा यांचा केला होता.
                    भारतातील शूटिंग दरम्यान एका गावात काम चालू होत. तलैवाला पाहून जवळपासच्या चार ते पाच गावातील मंडळी जमा दर्शनासाठी... दुसरा एखादा नट असला असता तर तो काम करून निघून गेला असता परुंतु हा आमचा देव आहे त्याने गर्दी वाढत आहे हे पाहून कामच थांबवलं आणि काय ? तर तो सगळ्या भक्तांना भेटत राहिला, सगळ्यांची विचारपूस करत त्यांच्या सोबत फोटो, ऑटोग्राफ देत राहिला.ही दर्शन रांग संपायला संध्याकाळ झाली परंतु आमचा देव दिवासभर उभा राहून भेटत राहिला. न थकता न थांबता. उत्साहाने आनंदाने !!! विशेष सांगण्या सारखं म्हणजे त्याने त्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करायला लावली आणि त्यांच्या सोबत त्याच जेवणाचा आस्वादही घेतला.
                         एकंदर म्हणजे काय आपला देव आपल्याला दु:खात पाहू शकत नाही. आपल्याच संप्रदायातील आणखी एक मोठ व्यक्तिमत्व आणि आपल्या देवाचे गुरुबंधु म्हणजे "कमल हसन सर". 'विश्वरुपम' चित्रपट पूर्ण करताना कमलसरांवर अशी वेळ आली की  त्यांना आपल्या राहत्या घरापासून सगळच बँकेकडे गहाण ठेवाव लागलं. पुढे त्या चित्रपटावर अनेक वाद उद्भवू लागले आणि चित्रपटावर बंदी होईल इतपर्यंत स्थिती वाईट झाली. अश्या वेळी चांगले-चांगले लोकं,नातेवाईक साथ सोडतात परंतु आमचा देव तलैवा तडक गेला कमल सरांच्या घरी आणि म्हणाला काळजी करू नको माझं घर, माझी जी काही संपती आहे ती तुझीच आहे आपण पुन्हा प्रयत्न करू, लढू. चिंता करू नको. पण तशी वेळच आली नाही चित्रपट रिलीज झाला आणि सुपरहिटही. कठीण काळात आपल्या माणसांची साथ न सोडणारा हा आपला देव.
                 रजनीकांत सरांची आणखी एक गोष्ट आहे जी बहुतेक जणांना माहित नाही. तलैवा हे फार अध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे ते नित्यपणे ध्यान साधना करतात. होय ! आणि त्यांना याचे बाळकडू लहानपणीच मिळालेले आहे. त्यांच्या मोठ्या भावांच्या आग्रहानुसार तलैवांच शालेय शिक्षण ''रामकृष्ण मठाच्या'' संचालित एका शाळेत झाला आहे. तेव्हा पासूनच त्यांना संस्कृत भाषा, वेद यांचा संस्कार मिळालेत. अभिनयाची सुरवात ही येथेच झाली,शाळेतील नाटकात ते एकलव्याची भूमिका बजावात असत.
                        तर असा हा आमचा देव भेटतो तरी कुठे ??? कुठेही !!! म्हणजे कुठेही.... बंगरूळूच्या कोण्या एका मंदिरात शांतपणे बसलेला असू शकतो किंवा चेन्नई मध्ये काम चालू असताना किंवा कोठे प्रवासाला जात असताना रस्त्याच्या कडेला थांबून जेवण करत असताना, स्वतःच ताट स्वतः धुवत असताना. एका साध्या कपड्यात लुंगी घालून बसलेला असताना....असाचं.
इतकी सामान्यपणे जीवन व्यतित करणारी ही 'असामी' आमचं आदर्श आहे, देव आहे यात काय हरकत ??? आम्हाला गर्व आहे आमच्या देवावर !! तलैवा ...!!!
(हा फोटो चेन्नईतील एका मॉलवर लावला आहे. १०० मीटर लांबीचा हा फलक त्या मॉलच्या मालकाने स्वखर्चाने लावला होता तेही एक वर्षापुर्वी .......... !!!!!!!!!!!!!!!!!!! )
आपणास कबाली दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....!a
(मुळ लेख २२ जुलै रोजी लिहिलेला आहे )

Thursday, 20 October 2016

नास्तिकता आणि नैतिकता

नास्तिकता आणि नैतिकता यात बराच अंतर आहे.
आपण जर आस्तिक असुनही अनैतिक कर्म केले तर तुमची प्रार्थना कधीच पोहचणार नाही; याउलट नास्तिक माणुस जर नैतिकतेने वागत असेल तर तो सर्वश्रेष्ठ गणला जाईल.नैतिकता हीच सर्वोच्च गोष्ट आहे.नैतिकता हेच माणुसकी आहे,हेच धर्म आहे.
आता हे कळण्यासाठी आपला विवेक जागृत पाहिजे. ज्ञाना पेक्षाही विवेक श्रेष्ठ आहे असे मागे एकदा बाबु 'आईन्स्टाईन' म्हणून गेलेत.........._/\_

Viru_break_the_rule


#Viru_break_the_rule_@219_309_319
                                     2011 वर्ल्डकप मधील पहिला सामना बांग्लादेश बरोबर होता त्याच्या एक दिवस आगोदर टीम ची बैठक सुरू होती परंतु सेहवाग साहेबांचा लक्ष दुसरीकडेच होत गुरु Gary kristen यानी सेहवागला हटकलं आणि  म्हणाले मागच्या वेळी (2007) याच टीम ने आपल्याला स्पर्धेबाहेर टाकले होते.
सेहवाग - ते फक्त एक दुर्घटना होती.
गुरु - म्हणजे तुला काय म्हणायचे आहे ?
सेहवाग - ते मी उद्या दाखवेन आणि  दुसऱ्या दिवशीच 49 ओवर खेळून 175 रन चोपले भाऊने......!!!
                                   सेहवाग हे क्रिकेट मधील एक्मेकाद्वीतीय व्यक्तीमत्व 295 वर असताना षटकार मारणार.  विरू सरांच्या टीम कीट मधे एक पोस्टर होत, एका पक्षाचे एक पक्षी अथांग आकाशात निर्विवादपणे भ्रमण करणार...!! विरेंद्रांच स्वभावाच मुळात तस आहे. सकाळी 4 वाजता उठून सराव करणारे मैदानात नेहमी सिंहाची भुमिका साकारायचे. अश्या या धडाकेबाज क्रिकेट देवास नमन, धन्यवाद !!!!!
त्यांच एक वाक्य
"रेकॉर्ड हे नेहमी तोडण्यासाठीच असतात "

Wednesday, 19 October 2016

The Shahid Bhagatsinghमाझी ''भारतमाता'' ही 'वाघांना' जन्म देणारी जननी म्हणून ओळखली जाते. 
                         असाच एक ‘खरा वाघ’ सुमारे १०९ वर्षापूर्वी भारताच्या पंजाब प्रांतात जन्मला. एक नाटककार, एक लेखक, कवी, उत्तम क्रीडापटू, तत्वज्ञानी, उत्तम राजनितीतज्ञ म्हणजे "थोर अमर क्रांतिकारी शहीद भगतसिंग". 
                          जगाच्या पाठीवर कुठे-कुठे क्रांती झाल्या आहेत त्यांचा संपुर्णपणे अभ्यास करून त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांना” आपल्या गुरुस्थानी मानून देशसेवेची शपथ घेतली. बालपणात बंदूक व काडतुसांची शेती करून इंग्रजांना पळवुन लावु असा विचार करणारे भगतसिंगाना मात्र आयुष्याचा निर्णायक क्षणी भारतभुमिसाठी ‘विचारांच्या क्रांतीची’ गरज वाटली; म्हणून त्यांनी संसदेत रिकाम्या जागी बॉम्ब फोडून भारतीय तरुणांना एक विचार देण्याचा प्रयत्न् केला. त्यांनी भारतीय तरुणांच्या ह्रिदयात एक आगीची ठिणगी पेटवली जी आज पर्यंत प्रत्येक भारतीय तरुणाच्या ह्रिदयात, नसानसात भिनत आहे. “मरून कसे जगतात...?’’ हे दुनियेला दाखवन्यासाठी त्यांनी आत्म समर्पण केल. “मातृभुमी की बलीवेदि पर वारो अपना तन-मन...!” म्हणत हसत-हसत  फासावर चढलेल्या या महान “तत्वाला” कोटी – कोटी प्रणाम.....!!!  _/\_