Think Out of The Box!

 सोलापुरात ३० वर्षापासून आमचं एक छोटस सायकलीच दुकान आहे. आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल कि अश्या प्रत्येक दुकानात एक ‘टिपिकल’ हवा भरण्याच मशीन असत, की ज्याचं बटन दाबल की हवा चालू होती आणि बंद केलं की हवा थांबते. असा पंप साधारण ४००० रुपयांच्या आसपास बाजारात मिळतो.

     दोन वर्षापूर्वी मी एक बदल केला एक “आटोमेटेड” मशीन आणली ज्याची किंमत पूर्वी असलेल्या पंपा पेक्षा पाचपट जास्त म्हणजे २०००० हजार होती. या नव्या मशीन मुळे एक ‘अमुलाग्र’ बदल आमच्या कामात झाला. कामाचा वेग तर वाढलाच पण या नव्या मशीनसाठी फक्त सकाळी एकदाच वीजपुरवठा चालू करायचं आणि रात्री जाताना बंद करायचं इतकच माझं काम; बाकी हवा ‘स्टाँक’ करून घेणे, गरज असताना हवा सोडणे हि मशीन स्वतःच करून घेते. 

यातून एक गोष्ट लक्षात येत आहे का आपल्याला...???  की मी त्या पूर्वीच्या मशीनसाठी काम करत होतो आणि हि नवीन मशीन माझ्यासाठी काम करते...!!!!

अगदी...अगदी ...अगदी असाच दृष्टीकोनातून  आपण आपल्या आयुष्याबाबत, दैनदिन कामा बाबतीत बघायला हव, म्हणजे “पैसा हा माझ्यासाठी काम करतोय की मी पैश्यासाठी ..?” माणूस म्हणून या श्रेष्ठ प्राणी प्रकारात आपला जन्म झाला आहे ते उगीच नाही; आपण हा विचार करू शकतो. हाच दृष्टीकोन आयुष्याच्या प्रत्येक भागावर लागू होतो....म्हणजे होम लोन/कार लोन माझ्यासाठी काम करताय की मी त्यांच्यासाठी...??? मला नक्की याची गरज आहे का..???

हेच तंत्र- T.V. फेसबुक,Whats App इत्यादी गोष्टी मी वापरतोय की ते मला...??? ही लिस्ट फार मोठी आहे.
माणूस म्हणून श्रेष्ठत्वाने जगायचं की गुलाम म्हणून....???

आपलाच                          
@नागेश बुद्धे

#Think_OutOfThe_Box



Think Out of the Box

Comments

Popular posts from this blog

डेटा आणि आपण

व्यापार आणि भावना