Posts

Showing posts from March, 2021

व्यापार आणि भावना

Image
व्यापार आणि भावना कोरोनो नंतरच्या काळात अजाणतेपणी खूप गोष्टी बदलल्या आहेत. जितक्या सूक्ष्म स्तरावर विचार करू तितक्या प्रमाणात बरे-वाईट बदल आपणास जाणवतील. मेनस्ट्रीम व्यवसाय वर परिणाम झाल्यावर माझ्या एका ज्येष्ठ मित्राने घरी आइस्क्रीम व दुधाचे छोटेखानी व्यवसाय सुरू केला. घरातील आई किंवा पत्नी  वेळ मिळेल तसे व्यापार सांभाळतील आणि  यात काहीतरी अल्पशा का होईना अर्थार्जन होईल अशी त्यांची आशा. एक छोटी पूजा करून प्रसादासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं असताना मी त्या दिवशी पोहोचू शकलो नाही. परत काही दिवसांनी त्यांच्याकडे सहज चक्कर टाकली. मुळात आम्ही सोलापूरकर फार भावनिक व आदरतिथ्य आहोत. दादानी फार आदरपूर्वक स्वागत करून गेल्या काही दिवसात या व्यवसायातील झालेल्या सकारात्मक बदल सांगत होते. आता किमान शंभर-दोनशे रुपये तरी व्यापार होतो, अमुक ही मागणी असते इत्यादी इत्यादी...  आणि त्यांनी मला त्यांच्या उत्पादनाचं एक लोकप्रिय मसाला दुधाची ऑफर केली. आदरातिथ्य म्हणून त्यांनी वारंवार आग्रह केला... आईस्क्रीम घेणार का..?  हे घेणार का..? किंवा हे आवडेल का..?  मी मनापासून विनवणी करत त्यांना नकार दिला. खरंतर की

कर्मयोग...

Image
कर्मयोग विचारात घेताना भारताचे संत गुरुदेव श्रीरामकृष्ण यांचे स्मरण येणे अनिवार्यच आहे. कितीही आदर भाव जागृत असला तरी स्वामी विवेकानंद हे एक मित्राप्रमाणे वा जेष्ठ बंधू वाटतात आणि ठाकुरजींच्या प्रति फक्त आणि फक्त गुरुदेव अशीच प्रतिमा मनात ठासते. एका अत्यंत गरीब घरात जन्मलेले रामकृष्ण हे सर्वांना कालिमाते चे पुजारी म्हणून एक भक्ती योगी वाटतात. खरे तर प्रत्येक योगात (कर्म,भक्ती,ज्ञान,राज) कर्म करणे अनिवर्याच आहे. लहानपणा पासूनच काली मातेची ओढ लागलेली असताना वंश परंपरे प्रमाणे ते त्यांच्या गावा जवळील एका मंदिरात पुजाऱ्याची नोकरी करीत असत. साधारणतः दहा-बारा वर्षे वय होते त्यांचे. पण, या कालीची सेवेतही त्यांना आता भान राहत नसे. त्यांना त्या परम तत्वाचे, आनंदाचे दर्शन घेण्याची ओढ सतावत होती. आणि आता ते पूर्ण वेळ साधानेसाठी त्या मंदिराच्या पायथ्याशी गंगेच्या किनारी एक कुटी बांधून वास्तव्यकरण्यास सुरुवात केली. श्रीरामकृष्णांनी त्या एकाच ठिकाणी बसून यत्नांचे यज्ञ केले. आणि त्यांना त्या दिव्यअनुभूती चे ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या त्या कर्मात एवढी ताकद होती की त्याच ठिकाणी वेळोवेळी श्रेष्ठ हुन