"फॅनधर्म"
"फॅनधर्म" भारतात अनेक धर्म आहेत, त्यापेक्षा जास्त जाती-पोटजाती, भाषा आणि देवदेवतांच तर विचारूच नका. खर तर एका अंगाने बघितलं तर आम्हाला 'विभागून' घेणेच आवडत म्हणा. मी अमका तू तमक्या चा...... परंतु या सर्व धर्मानां पुरून उरणारा अजून एक धर्म आहे, "फॅनधर्म"...... !!!! होय, फॅनधर्म किंवा फॅनीजम. आपल्याला कल्पना असो व नसो आपण कमी अधिक प्रमाणात या धर्मात मोडतोच. धर्म आला म्हणजे देव आलाच! येथे मात्र देवाबद्दल गफलत नाही येथे फक्त एकच देव आहे..... होय एकचं देव ... आमचा तलैवा आपला रजनीकांत.... या धर्मांची व्याप्ती फारच मोठी आहे. भारतातील दक्षिणेत याचा प्रभाव जास्त असला तरी या धर्माचे अनुयायी जगभर पसरलेले आहेत. उगीच सांगत नाही तसा पुरावाच आहे माझ्याकडे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या नोंदीत आहे की जगात सगळ...