दोन झाडं
दो न झाडं हि गोष्ट आहे दोन झाडांची. दोन्ही झाडं वेगळ्या प्रकारची, दोघांचा वैशिष्ट्य-गुणधर्म सारं काही वेगळं फक्त जातीन झाडं होती एवढंच. उदाहरणादाखल आपण एक झाडं कडुलिंब तर दुसरा बदामाचं समजुयात. दोघांच जन्म एकाच दिवशी एकाच वेळी झालं होतं. ‘रोपवयात’ दोघांना सारखाच वातावरण मिळालं. तोच सुर्य, तोच पाऊस, तीच मंद झुळूक हवा यांच्या आशीर्वादानं दोन्ही वाढली. पण यात बदामाच झाडं लवकर बहरायला लागलं. सगळे म्हणायला लागले की ‘किती छान वाढतंय हे बदामाच झाडं...! आणि हे काय कडुलिंबाचं कधी वाढणार काय माहित..? खरं तर दोन्ही झाडं वाढतच होती परंतु कडुलिंबाची वाढ हि सावकाश होत होती. आतातर बदामच झाड गोड-गोड बदाम पण द्यायला लागलं. असेच काही वर्ष सरून गेली. गावात एक दिवस वादळ आलं, मोठ्ठ वादळ. तुफान वारा, मुसळधार पाऊस. यात ते बदामाचं झाडं दुर्दैवाने उळमळून ...