Posts

Showing posts from 2020

युवराज सिंग

Image
प्रिय मित्र युवराज सिंग    तू आलास तेव्हा नुकतच कुठे भारतीय क्रिकेट उमलत होतं... नजरेत नजर मिळवायची हिंमत दाखवत होतं.... डिफेन्स करत मैदानावर टिकणे शिकत होतं.... आणि आत्ता कुठे शंभरच्या स्ट्राईक रेटने धावत होतं. मग तू आलास!!! (हे वाक्य एमएस धोनी सिनेमाप्रमाणे “फिर आता है युवराज सिंग” अशा ट्यून मध्ये फिल कराव) युवराज...!!!!!!!            ज्यांनी क्रिकेट जन्माला घातलं त्यांच्या नजरेला नजर भिडून हम भी है जोश में म्हणत त्यांच्याच लॉर्डसवर 300 प्लस चेस करून “दादाला” टी-शर्ट काढून फिरवयाची संधी मिळवून दिलीस...! तू अख्खा जगाला सांगितलं “ये नया इंडिया है... ये चेस भी करेगा और आंखोसे आंख भी मिलायेगा...!” शंभरच्या स्ट्राइक मध्ये धन्य माणनाऱ्या टीम इंडियाला तू ‘एकशे पन्नास’ च्या गतीने धावायला लावलंस!   जॉन्टी रोड्स चे बरेच किस्से आम्ही ऐकायचो; पण खरा जॉन्टी आम्हाला तुझ्या रुपाने मैदानात दिसला आणि आम्ही ही तुझ्यासारखे कॅच पकडण्याच्या प्रयोगात हात पाय मोडून घेतले. परंतु तू थांबला तरी त्या क्षेत्रातून बॉल सीमेकडे जाणार नाही ...