Posts

Showing posts from October, 2016

नास्तिकता आणि नैतिकता

नास्तिकता आणि नैतिकता यात बराच अंतर आहे. आपण जर आस्तिक असुनही अनैतिक कर्म केले तर तुमची प्रार्थना कधीच पोहचणार नाही; याउलट नास्तिक माणुस जर नैतिकतेने वागत असेल तर तो सर्वश्रेष्ठ गणला जाईल.नैतिकता हीच सर्वोच्च गोष्ट आहे.नैतिकता हेच माणुसकी आहे,हेच धर्म आहे. आता हे कळण्यासाठी आपला विवेक जागृत पाहिजे. ज्ञाना पेक्षाही विवेक श्रेष्ठ आहे असे मागे एकदा बाबु 'आईन्स्टाईन' म्हणून गेलेत.........._/\_

Viru_break_the_rule

Image
#Viru_break_the_rule_ @219_309_319                                      2011 वर्ल्डकप मधील पहिला सामना बांग्लादेश बरोबर होता त्याच्या एक दिवस आगोदर टीम ची बैठक सुरू होती परंतु सेहवाग साहेबांचा लक्ष दुसरीकडेच होत गुरु Gary kristen यानी सेहवागला हटकलं आणि  म्हणाले मागच्या वेळी (2007) याच टीम ने आपल्याला स्पर्धेबाहेर टाकले होते. सेहवाग - ते फक्त एक दुर्घटना होती. गुरु - म्हणजे तुला काय म्हणायचे आहे ? सेहवाग - ते मी उद्या दाखवेन आणि  दु सऱ्या दिवशीच 49 ओवर खेळून 175 रन चोपले भाऊने......!!!                                    सेहवाग हे क्रिकेट मधील एक्मेकाद्वीतीय व्यक्तीमत्व 295 वर असताना षटकार मारणार.  विरू सरांच्या टीम कीट मधे एक पोस्टर होत, एका पक्षाचे एक पक्षी अथांग आकाशात निर्विवादपणे भ्रमण करणार...!! विरेंद्रांच स्वभावाच मुळात च तस आहे. सकाळी 4 वाजता उठून सराव करणारे मैदानात नेहमी सिंहाची भुमिका साकारायचे. अश्या या धडाकेबाज क्रिकेट देवास नमन, धन्यवाद !!!!! त्यांच एक वाक्य "रेकॉर्ड हे नेहमी तोडण्यासाठीच असतात "

The Shahid Bhagatsingh

Image
माझी ''भारतमाता'' ही 'वाघांना' जन्म देणारी जननी म्हणून ओळखली जाते.                           असाच एक ‘खरा वाघ’ सुमारे १०९ वर्षापूर्वी भारताच्या पंजाब प्रांतात जन्मला. एक नाटककार, एक लेखक, कवी, उत्तम क्रीडापटू, तत्वज्ञानी, उत्तम राजनितीतज्ञ म्हणजे "थोर अमर क्रांतिकारी शहीद भगतसिंग".                            जगाच्या पाठीवर कुठे-कुठे क्रांती झाल्या आहेत त्यांचा संपुर्णपणे अभ्यास करून त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांना” आपल्या गुरुस्थानी मानून देशसेवेची शपथ घेतली. बालपणात बंदूक व काडतुसांची शेती करून इंग्रजांना पळवुन लावु असा विचार करणारे भगतसिंगाना मात्र आयुष्याचा निर्णायक क्षणी भारतभुमिसाठी ‘विचारांच्या क्रांतीची’ गरज वाटली; म्हणून त्यांनी संसदेत रिकाम्या जागी बॉम्ब फोडून भारतीय तरुणांना एक विचार देण्याचा प्रयत्न् केला. त्यांनी भारतीय तरुणांच्या ह्रिदयात एक आगीची ठिणगी पेटवली जी आज पर्यंत प्रत्येक भारतीय तरुणाच्या ह्रिदयात, नसानसात भिनत आहे. “मरून कसे जगतात...?’’ हे दुनियेला दाखवन्यासाठी त्यांनी आत्म समर्पण केल. “मातृभुमी की बलीवेदि पर वार